पोस्ट्स

चित्रपट आणि जीवन

 आजच्या काळात उभ्या आयुष्यात एक ही चित्रपट पाहिलेला मानवी जीव सापडण कठीणच किंवा निव्वळ अशक्य. चित्रपटाची निर्मिती, त्याचा इतिहास, प्रकार किंवा त्याच विश्लेषण या गोष्टीत न अडकता एक नजर फक्त चित्रपट आणि मानवी जीवन यावर टाकली तर अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतील. १. चित्रपटाची कथा आणि आपल्या आयुष्याची कथा ही आपण लिहित नसतो.  २. चित्रपटाला जसा एक दिग्दर्शक दिशा देत असतो तसेच आपल्या आयुष्यात परिस्थिती आपल्याला दिशा देत असते. ३. नायक अथवा नायिका .... कहानी कशी जरी वळणावळण ची असली तरी त्याचा शेवट हा नायक आणि नायकाच्या बाजूनेच होत असतो. असाच हॅपी एंड आपला असेल याचा विश्वास किमान चित्रपट पाहताना तीन तास का असेना आपल्याला मिळतो. ४. किमान तीन तास आपण आपल्या समस्या, अडचणी, संकट बाजूला ठेवून मनाला गुंतवून ठेवण्यात यश मिळवतो.( यालाच आपण ध्यान अस म्हणू शकतो) ५. एखाद्या व्यक्तिरेखेचा आपल्या जीवनावर कायमचा सकारात्मक परिणाम पडू शकतो. ६. खलनायक किती ही बलशाली असला तरी त्याचे पतण हे निश्चित आहे यावर विश्वास बसतो. ७. तीन तासांचा चित्रपट किमान सात दिवस ऊर्जा आपल्याला प्रदान करतो.

शाही शब्द

इमेज
  तो पायदळातील सैनिक ज्या तावाने समोरील दुश्मन सैन्यावर चाल करून जातात त्याच आवेशाने शाळेच्या आवारात घुसला . त्याचा करारी आवाज ऐकून   बेसावधपणे तंबाखू मळणार्या बोटांची मुठी झाकत शिपायाने त्याला डिसुझा टीचर कुठे आहेत ते सांगितलं .तो स्टाफरूम च्या दिशेने वळला .. डिसुझा टीचर नुकत्याच झालेल्या जेवणाच टेबल वरील अस्तित्व साफ करत होत्या ,त्यांची नजर दारावर झालेल्या टकटक या आवाजाने वळली ,साधारण ३२-३५ च्या वयाचा ,उंच ,देखणा, रुबाबदार पुरुष पाहून डिसुझा टीचर च्या भुवयांचे धनुष तयार झाले . अ...अ कोण आपण ? पहाडी आवाजात उत्तर आल..” शिवानी देशमुख इयत्ता ३ री या पाल्याचा पालक “ गेल्या पाच वर्षात कोणत्याच पालक सभेला किवां शालेय कार्यक्रमाला शिवानीची आईच हजर असयायची हि व्यक्ती कधीच पाहण्यात नसल्याने डिसुझा टीचर त्यांना ओळखू शकल्या नाहीत . “गुड आफ्टरनून मिस्टर देशमुख “ ओळख पटल्यावर डिसुझा टीचर बोलल्या “ कधी पाहिल नव्हत तुम्हाला so ...sorry हा” its ok mam वाक्य नम्रतेच होत पण चेहरा गंभीर ! डिसुझा टीचर यांनी देशमुखांना भेटायला येण्याच कारण विचारल . मागच्या आठवड्यात तुमच्या शाळेची युनिट टेस्ट झाली त्

दुःखाचे प्रकार

 मनुष्याच्या आयुष्यात फक्त चार प्रकारचीच दुःख असू शकतात भले कारणं अनेक असतील ...  १. आर्थिक  २. शाररिक  ३. मानसिक  ४. बौद्धिक  तुमच्या आयुष्यात सुखाची हवा सुटू दे अन दुःखाचा दिवा विझू दे  . sanju000005.blogspot.com

Mukti... The freedom

होता अनाथ तो  रोज बोचऱ्या शब्दाने व्हायचा घायाळ तो  रोज व्ह्याचा मनातून रक्ताचा पूर  मदती साठी नजर फिरायची दूर दूर  न दिसणारी जखम एकटाच न्याहाळायचा  मलम म्हणून त्यावर अश्रू ढाळायचा  एक दिवस रक्ताने सुद्धा त्याला अनाथ  केलं  जख्मे सहित देहाला सुद्धा शुष्क केलं  लोकं म्हणाली बर झालं देवाने याला मूक्त केलं