शाही शब्द
तो पायदळातील सैनिक ज्या
तावाने समोरील दुश्मन सैन्यावर चाल करून जातात त्याच आवेशाने शाळेच्या आवारात
घुसला . त्याचा करारी आवाज ऐकून बेसावधपणे
तंबाखू मळणार्या बोटांची मुठी झाकत शिपायाने त्याला डिसुझा टीचर कुठे आहेत ते
सांगितलं .तो स्टाफरूम च्या दिशेने वळला ..
डिसुझा टीचर नुकत्याच
झालेल्या जेवणाच टेबल वरील अस्तित्व साफ करत होत्या ,त्यांची नजर दारावर झालेल्या
टकटक या आवाजाने वळली ,साधारण ३२-३५ च्या वयाचा ,उंच ,देखणा, रुबाबदार पुरुष पाहून
डिसुझा टीचर च्या भुवयांचे धनुष तयार झाले . अ...अ कोण आपण ?
पहाडी आवाजात उत्तर आल..” शिवानी
देशमुख इयत्ता ३ री या पाल्याचा पालक “ गेल्या पाच वर्षात कोणत्याच पालक सभेला
किवां शालेय कार्यक्रमाला शिवानीची आईच हजर असयायची हि व्यक्ती कधीच पाहण्यात
नसल्याने डिसुझा टीचर त्यांना ओळखू शकल्या नाहीत . “गुड आफ्टरनून मिस्टर देशमुख “
ओळख पटल्यावर डिसुझा टीचर बोलल्या “ कधी पाहिल नव्हत तुम्हाला so ...sorry हा”
its ok mam वाक्य नम्रतेच
होत पण चेहरा गंभीर ! डिसुझा टीचर यांनी देशमुखांना भेटायला येण्याच कारण विचारल .
मागच्या आठवड्यात तुमच्या शाळेची युनिट टेस्ट झाली त्यात माझ्या मुलीला इंग्रजी या
विषयात २० पैकी १९ गुण मिळाले तीचा एकच गुण गेला या संदर्भात मी विचारणा करायला
आलोय अस देशमुखांनी सांगितल . कारण ऐकून डिसुझा टीचर आश्चर्य व्यक्त करत बोलल्या “
अहो तीला सर्वच विषयात पैकीच्या पैकी गुण आहेत फक्त इंग्लिश मध्ये एकच मार्क गेलाय
तीचा ..its Quit Mr देशमुख “ हातातील पेपर टेबल वर ठेवत आणि डोक्यातला राग मनात
दाबत देशमुख डिसुझा टीचर ला पेपर दाखवतात “ हे पहा हरणाच स्पेलिंग माझ्या मुलीने
Deer न लिहिता Dear अस लिहील आणि तुम्ही तीचा एक मार्क कमी केला ?
डिसुझा टीचर च्या
चेहेर्यावरील भाव हेच दाखवत होते कि देशमुखांचा प्रश्न हा त्यांची मूर्खता दाखवत
आहे “ या चूक काय आहे मिस्टर देशमुख ? ” थोड कूचकट हस्य करत डिसुझा टीचर बोलल्या
अहो एक अक्षर चुकल कि पूर्ण अर्थच बदलत नाही का ?
चुकला तर ???? अचानक देशमुखांचा रुद्रावतार पाहून भयभीत झालेल्या डिसुझा टीचर या प्रश्नांनी आता बुचकळ्यात पडल्या . जीव जिभेवर आणत त्यांनी विचारल को..कोण ..ता शब्द ? या वर सिंघ गर्जना व्हावी जसा आवाज घुमला “ छत्रपती ....!”
मला काहीच नाही समजत आहे
Mr.देशमुख जरा Explain कराल का ? अगदी काकुळतीला येऊन डिसुझा टीचर नी विचारल . “
माझी मुलगी सांगत होती वर्गात अभ्यास न करणाऱ्या ,खोड्या काढणाऱ्या ,भांडण
करणाऱ्या आणि गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या मुलांना तुम्ही काय संबोधता ?....छत्रपती
....?
महराजांनी अनाथांना
,गरिबांना अन्याय सहन करणाऱ्या लोकांना जो आर्थिक ,मानसिक आश्रय दिला जे छत्र दिल
त्या गुणांना छत्रपती म्हणतात आणि तुम्ही हि अनमोल उपाधी अश्या मुलांना देता ?
माझ्या मुलीने चुकून एक अक्षर चुकीच लिहील तर अर्थ बदलला तुम्ही तर जाणून बुजून हा
शाही शब्द चुकीच्या लोकांसाठी वापरता ? जर एका चुकीच्या अक्षराची शिक्षा एक मार्क
कट करण्याची असेल तर या एका शब्दासाठी तुमची जीभच कापायला हवी ना ?देशमुखांच्या हर्द्य्यात साक्षात महाराज अवतरल्याचा भास डिसुझा
टीचर ला होत होता . “ I am sorry ...खरच मला या शब्दाच महत्त्व एवड जाणवलच न्हवत “
आता तर ज्वालामुखीच्या उद्रेकाने उच्चांक गाठला “ कशी असेल जाणीव ? जर
महाराजांच्या गुणांचा ,विचारांचा ,शोर्यांचा आणि स्वराज्यासाठी केलेल्या त्यागांचा
इतिहास फक्त शाळेत असताना मार्क्स मिळवण्या पुरताच केला असेल तर कशी असेल या शाही
शब्दाची जाणीव ? पण याद राखा सत्य आणि त्याच गांभीर्य जर माहित नसेल तर मुग गिळून
गप्प बसा कोणत्याही शाही शब्दाला वेगळ्या अर्थाने वापरू नका ..मुलांवर चुकीचे
संस्कार चुकून हि करू नका “ एवढ बोलून देशमुख पाठ करून निघून गेले पण डिसुझा टीचर
त्यांच्या पाठीवर त्यांनी कोणाकोणाला हे शाही शब्द वापरले होते याची चित्र पाहू
लागल्या होत्या ,आता नकळत त्यांच्या दोन्ही हातांनी स्वताचेच कान धरले होते ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा