शाही शब्द
तो पायदळातील सैनिक ज्या तावाने समोरील दुश्मन सैन्यावर चाल करून जातात त्याच आवेशाने शाळेच्या आवारात घुसला . त्याचा करारी आवाज ऐकून बेसावधपणे तंबाखू मळणार्या बोटांची मुठी झाकत शिपायाने त्याला डिसुझा टीचर कुठे आहेत ते सांगितलं .तो स्टाफरूम च्या दिशेने वळला .. डिसुझा टीचर नुकत्याच झालेल्या जेवणाच टेबल वरील अस्तित्व साफ करत होत्या ,त्यांची नजर दारावर झालेल्या टकटक या आवाजाने वळली ,साधारण ३२-३५ च्या वयाचा ,उंच ,देखणा, रुबाबदार पुरुष पाहून डिसुझा टीचर च्या भुवयांचे धनुष तयार झाले . अ...अ कोण आपण ? पहाडी आवाजात उत्तर आल..” शिवानी देशमुख इयत्ता ३ री या पाल्याचा पालक “ गेल्या पाच वर्षात कोणत्याच पालक सभेला किवां शालेय कार्यक्रमाला शिवानीची आईच हजर असयायची हि व्यक्ती कधीच पाहण्यात नसल्याने डिसुझा टीचर त्यांना ओळखू शकल्या नाहीत . “गुड आफ्टरनून मिस्टर देशमुख “ ओळख पटल्यावर डिसुझा टीचर बोलल्या “ कधी पाहिल नव्हत तुम्हाला so ...sorry हा” its ok mam वाक्य नम्रतेच होत पण चेहरा गंभीर ! डिसुझा टीचर यांनी देशमुखांना भेटायला येण्याच कारण विचारल . मागच्या आठवड्यात तुमच्या शाळेची युनिट टेस्...