Mukti... The freedom
होता अनाथ तो
रोज बोचऱ्या शब्दाने व्हायचा घायाळ तो
रोज व्ह्याचा मनातून रक्ताचा पूर
मदती साठी नजर फिरायची दूर दूर
न दिसणारी जखम एकटाच न्याहाळायचा
मलम म्हणून त्यावर अश्रू ढाळायचा
एक दिवस रक्ताने सुद्धा त्याला अनाथ केलं
जख्मे सहित देहाला सुद्धा शुष्क केलं
लोकं म्हणाली बर झालं देवाने याला मूक्त केलं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा