पोस्ट्स

Mukti... The freedom

होता अनाथ तो  रोज बोचऱ्या शब्दाने व्हायचा घायाळ तो  रोज व्ह्याचा मनातून रक्ताचा पूर  मदती साठी नजर फिरायची दूर दूर  न दिसणारी जखम एकटाच न्याहाळायचा  मलम म्हणून त्यावर अश्रू ढाळायचा  एक दिवस रक्ताने सुद्धा त्याला अनाथ  केलं  जख्मे सहित देहाला सुद्धा शुष्क केलं  लोकं म्हणाली बर झालं देवाने याला मूक्त केलं